कवी ग्रेस ह्यांच्या " चंद्रमाधवीचे प्रदेश " ह्या काव्यसंग्रहातील ही कविता.
कवी ग्रेस ह्यांच्या ह्या कवितेची श्री श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा..
मर्म [चंद्रमाधवीचे प्रदेश]
ज्याचे त्याने घ्यावे
ओंजळीत पाणी
कुणासाठी कोणी
थांबू नये!
…असे उणे नभ
...ज्यात तुझा धर्म
माझे मीही मर्म
स्पर्शू नये
धर्म म्हणजे खरे काय याचा शोध कोणी करत नाही. प्रत्येक धर्मावलंबी धर्म म्हणजे त्याचे स्वतःचे मत, सम्प्रदाय अथवा पंथ आहे हे समजून धर्माची व्याख्या करत असतो पण संकुचित उपासना पद्धति म्हणजे 'धर्म' नाही. धर्म म्हणजे 'धारण' करणे.जीवनातले शाश्वत नियम पालन करणे हाच खरा धर्म. धर्माचे स्वरूप आकाशा प्रमाणे विस्तृत आहे पण त्याचे सुप्त स्वरूप शोधण्याचा प्रयत्न कोणी करत नाही.
Khup sundar kavita aani tevdhich chhan samiksha sudhha... Apratim... :)
ReplyDelete