Friday, 4 May 2012

Calligraphy-04.05.2012Caligraphic Expression ह्या ब्लॉगचा आजचा १०० वा दिवस !
दरवर्षी जानेवारीत नवीन संकल्प करायचा आणि तो महिन्याभरात मोडूनहि जायचा. ह्यावर्षी " मराठी सुलेखनाचा प्रयत्न करावा आणि सुलेखानातून रोज एकतरी आवडलेली कविता / गाणी लिहावी " अशी संकल्पना होती. facebook वर रोज एक " चित्र" सदर करणारे श्री सुरेश पेठे आणि bolgspot च्या माध्यमातून रोज एक "ओम " सादर करणाऱ्या श्री महेंद्र मोरे ह्यांच्याकडून खऱ्या अर्थाने प्रेरणा घेऊन सुरु केलेला हा प्रयत्न.
इतर संकल्पाप्रमाणे हा ही संकल्प फारतर एक-दीड महिना चालेल आणि त्यातून फक्त मराठी कविता त्या कोण वाचतील अशी एक शंका होती. पण तसे झाले नाही. आपण सर्व तसे अनोळखी. पण ह्या संकल्पामुळे facebook आणि blogspot वर आपल्या प्रतिक्रिया नोंदवून मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलेत. आजपावेतो १९००० pageviews ह्या कवितांना भारतातून आणि अन्य ३० देशातून मिळाले. काहींनी वेळोवेळी मराठीतील चांगल्या कविता पाठवून सहकार्य केले.काहींनी अतिशय सुंदर अशी गाणी सुचवली. त्या सर्व कविता सुलेखनातून ह्या १०० दिवसात लिहिता आल्या. ( काही पावसावरील गाणी असल्याने राखून ठेवली आहेत) . आपण सर्वांनी केलेल्या ह्या उदंड सहकार्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे.- बी जी लिमये.

आजची सुलेखनासाठी निवडलेली , मराठीतील ख्यातनाम कवी बा. भ. बोरकर ह्यांची " लावण्यरेखा " ही " माणसाचे देखणेपण" कशात आहे सांगणारी कविता.

1 comment:

  1. May U continue to give us joy via your unique blog!

    Dr.Asmita Phadke
    Pune

    ReplyDelete