Sunday, 8 July 2012

Calligraphy-08.07.2012


आजच्या सुलेखानासाठी निवडलेले हे गीत मराठीतील प्रख्यात साहित्यिक गो. नी. दांडेकर ह्यांचे असून स्नेहल भाटकर ह्यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत ज्योत्स्ना भोळे ह्यांनी गायिले आहे.
आज ८ जुलै .. गो नी दा ह्यांचा जन्मदिवस. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे जन्म घेतलेल्या गोनीदानी वयाच्या १३ व्या वर्षी स्वातंत्र्य युद्धात सहभागी झाले. शितू , पडघवली, जैत रे जैत अशी २३ हून अधिक सुंदर कादंबऱ्या आणि त्यांची दुर्ग भ्रमंती वरील दुर्ग भ्रमणगाथा व इतर ६ पुस्तके, मोगरा फुलला , दास डोगरी राहतो , देवकीनंदन गोपाला अशी ९ चरित्रे त्यानी लिहिली.१९७६ साली त्यांच्या " स्मरण गाथा" ह्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला.
१९९० मधल्या एक संध्याकाळी त्यांच्या राहत्या घरी जेव्हा भेटले तेव्हा पक्षाघाताच्या आजारातून उठण्याचा प्रयत्न करणारे गोनीदा पाहायला मिळाले.माझा अक्षर संग्रह पाहताना पाणावलेल्या डोळ्यांनी आपण आता लिहू देवू शकत नाही अशी खंत व्यक्त केली पण नंतर एका पॅडला लावलेल्या कोऱ्या कागदावर आपल्याला अशाही अवस्थेनंतर लिहिता आले पाहिजे ह्या जिद्दीने करत असलेला सराव दाखवला. त्याच कागदाखाली सही करत हा कागद मला भेट केला. 
Today's calligraphy tribute to Go Nee Dandekar's song which was composed by Snehal Bhatakar and sung by Jyotsna Bhole. 

No comments:

Post a Comment