कवी ग्रेस ह्यांची ही कविता... ह्या कवितेची श्री श्रीनिवास हवालदार ह्यांनी लिहिलेली समीक्षा..
जे सोसत नाही असले –
जे सोसत नाही असले
तू दुक्ख मला का द्यावे
परदेशी अपुल्या घरचे
माणुस जसे भेटावे
मिटल्यावर डोळे मजला
स्मरतात निरंतर नाद
हाताने मागावे का
त्यांचे नवे पडसात
अंधारच असतो मागे
अन पुढे सरकतो पारा
सूर्याच्या सक्तीनेही
कधी नष्ट न झाल्या तारा
हातात तुझ्या जे आले
ते मेघ न फूल न गाणे
स्वप्नातही स्पष्ट समजते
हे असे अवेळी फुलणे
ग्रेस देवाला विचारतात की मला सहन होणार नाही असे दुक्ख मला तू का दिले आहेस? मी कुठेही गेलो तरी ते माझ्या मागेच असते. काही वेळा वातावरणात बदल व्हावा म्हणून माणूस परदेशी जातो परंतु तेथेही पूर्वीचे वातावरणात काहीच बदल होत नाही.झोपेतही मला निरंतर जुन्या अप्रिय आठवणी येतात आणि माझ्या हातानी ज्या नवीन कविता लिहिल्या जातात त्यातही त्याच आठवणी काहीश्या नवीन रूपात प्रकट होतात.माझ्यामागे सतत अंधकार पाठलाग करत असतो.रात्र संपून सूर्याचा प्रकाश झाला तरी तो अंधार आणि तार्यांचे अस्तित्व नष्ट करू शकत नाही.तसेच माझ्या जीवनातला अंधकार राहणारच. तुझ्या हातात माझ्या ज्या कविता येतात त्यात फुलांचा सुगंध किवा संगीताचे स्वर नाहीत नाही परंतु मेघाचे अश्रू आहेत. माझ्या कवितांचा बहर अवेळी का येतो हे स्वप्नातही कळू शकेल कारण त्या नेहमीच दुक्खाने परिपूर्ण असतात.
No comments:
Post a Comment